शिवशाही बसवर दगडफेक, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२। एकीकडे महापरिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असताना ज्या बस सुरु आहेत त्यावर होणारे हल्ले देखील थांबत नाही. शुक्रवारी गाडेगाव घाटात रात्री ८ वाजता शिवशाही बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव आगाराची शिवशाही बस क्रमांक एमएच.१८.बीजी.८७१ ही औरंगाबाद येथून जळगावकडे येत असतांना शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली. यात बसच्या समोरील काच फुटून नुकसान झाले आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर बसवाहतक युवराज प्रधान कोळी व बसचालक रोहन संजय पाटील (वय-२८) रा. हिंगोणा ता.चोपडा यांनी शिवशाही बस थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणली. बसचालक रोहन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गफुर तडवी करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -