fbpx

Video : कामगारानेच मारला डल्ला, दोघांना रंगेहाथ पकडले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरात असलेल्या विधाता मार्केटमधील एका होलसेल कापड दुकानात काम करणाऱ्या कामगारांनीच डल्ला मारल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

सिंधी कॉलनीतील रहिवासी मुकेश अर्जुनदास वाधवाणी यांचे बळीरामपेठेत विधाता मार्केटमध्ये सतनाम हँडलूम नावाने दुकान आहे. दुकानात किरण दत्तू नन्नवरे, पंकज राजू कोळी काम करतात. मंगळवारी दुपारी २ वाजता दुकान मालक मुकेश वाधवाणी हे कामानिमित्त शेजारच्या दुकानात गेले होते. 

काही वेळाने ते बाहेर आले असता दुचाकी क्रमांक एमएच.१९.एएल.१६६५ वर लेडीज गारमेंट असलेली गोणी पंकज कोळी हा घेऊन जात होते. तेव्हा मागे राकेश सपकाळे हा बसलेला होता. वाधवानी यांनी मागील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दि.१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता स्त्रियांचे स्कार्फ दुकानातून काढून किरण ननावरे व पंकज कोळी हे चोरी करताना दिसून आले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज