fbpx

सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार, आजीने घातले पाठीशी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । जळगाव शहरात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. महाबळ परिसरात राहत असलेल्या २० वर्षीय तरुणीवर तिच्या सावत्र बापाने अत्याचार केल्याप्रकरणी तरुणीच्या आजोबांनी (आईच्या वडिलांनी) याबाबत एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेतल्याने पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा जळगाव रामानंद नगर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.

बाप-लेकीचे नाते पवित्र मानले जाते परंतु जळगाव शहरातील एका बापाने या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. महाबळ परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या वीस वर्षीय मुलीवर फेब्रुवारी २०१९ पासून वेळोवेळी जबरदस्ती अत्याचार केले. आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत पीडित तरुणीने आजी (वडिलांची आई) ला कळविले असता तिने देखील त्याकडे दुर्लक्ष करीत अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला पाठीशी घालण्याचे काम केले. पीडित तरुणीच्या आईला घडलेल्या प्रकाराबाबत कल्पना आल्याने तिने तिला पुणे येथे आपल्या आई वडिलांकडे पाठविले.

नराधम सावत्र बापाने तरीही मुलीचा पिच्छा सोडला नाही. तो तिला वारंवार मेसेज पाठवून, कॉल करून पुन्हा जळगावी बोलवत होता. जळगावला न आल्यास पीडित तरुणीच्या आईला व लहान बहिणीला त्याने त्रास देण्यास सुरुवात केली. आपल्या आई बहिणीवर होत असलेल्या अन्यायाला कंटाळून पीडित मुलीने आजी-आजोबांना याबाबत सांगितले असता त्यांनी पुण्यातील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने पुणे पोलिसात गुन्हा दाखल केला. नराधम बाप आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या आईविरुद्ध दाखल गुन्हा रामानंद नगर पोलीस वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज