खाजगी प्राथमिक महासंघाचे वेतन अधीक्षकांना निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । सहाव्या वेतन आयोगाचा हप्ता बाकी असलेल्या शिक्षकांची माहिती मागवून त्यांना त्याचा लाभ मिळावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्यमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघातर्फे प्राथमिक विभागाच्या वेतन अधिक्षिका आर.बी. संदानशिवे यांना देण्यात आले.

निवेदनात सहाव्या वेतन आयोगाचा हप्ता बाकी असलेल्या शिक्षकांची माहिती मागून लाभ मिळावा, सन २०११-१२ मध्ये आपल्या कार्यालयाकडून कपात झालेल्या आयकर रिटनबाबत प्रश्न मार्गी लावावा, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत हमीपत्र घेऊन लागू करावी, टीईटी अपात्र शिक्षकांना त्यांचे हमीपत्र घेऊन वेतना बाबत निर्णय घ्यावा, वेतनेतर अनुदान वितरीत करण्याबाबत कार्यवाही व्हावी, शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन पी.एफची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत, डीसीपीएसची रक्कम एनपीएसमध्ये वर्ग करणेबाबत कार्यवाही व्हावी, एमपीएसची रक्कम वेतन झाल्यावर तात्काळ वर्ग होणेबाबत कार्यवाही व्हावी, थकीत पुरवणे बिले व वैद्यकीय बिलांच्या आपल्या स्तरावरून पाठपुरावा व्हावा, आपले प्रशासन गतीमान होण्‍यासाठी कार्यालयात पुरेशा व चांगल्या कर्मचारी वर्गाची मागणी शासनाकडे करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यांची होती उपस्थिती
प्राथमिक विभागाच्या वेतन अधिक्षिका आर.बी. संदानशिवे यांना निवेदन देतेवेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अशोक मदाने, जिल्हाध्यक्ष हेमंतकुमार पाटील, जिल्हा सचिव देवेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष गोविंदा लोखंडे, उपाध्यक्ष सुनिल पवार, तालुका सचिव अजित चौधरी, तालुका प्रसिद्धीप्रमुख योगेश भालेराव, घोलप आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज