आयटीआयच्या प्रलंबित मागण्यांबाबत प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी प्रांत अधिकारी यांना आयटीआयच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. मथुरा येथून दिनांक 26 ऑक्टोबरपासून दिल्ली येथे पदयात्रा काढून जंतर मंतर येथे उद्या 1 नोव्हेबर रोजी भव्य मोर्चा चे आयोजन केलेले आहे. यानिमित्त प्रलंबित मागण्यांसाठी तसेच दिल्ली येथील मोर्च्याबाबत प्रांत अधिकारी कैलास गडलकर यांना निवेदन देण्यात आले.

कोरोना या महामारीचे कारण देऊन शासनाने थर्ड शिफ्ट बंद करून तसेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा लांबणीवर टाकून शैक्षणिक नुकसान केले आहे. त्याचप्रमाणे आयटीआयतील शिकणारा विद्यार्थी हा श्रमिक कामगार होणार आहे. मात्र शासनाने त्यांच्यावर ऑनलाइन परीक्षेचा मोठा बोजा टाकून दूर वरील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पाठवून आर्थिक भुर्दंड तसेच उच्चशिक्षित परीक्षा ऑफलाईन स्वरूपाच्या होत.

आयटीआयच्या विद्यार्थ्यां वरच शासन अन्याय करीत असल्याने प्रांत कार्यालयावर फैजपूर येथील शुभाष चौक पासुन प्रांत कार्यालयापर्यंत मूक मोर्चा चे आयोजन करून प्रांत अधिकाऱ्यांना संघटनेचे अध्यक्ष पी ई पाटील सर, सचिव – तुषार धांडे, एम एस चौधरी, आयटीआय चे निर्देशक पराग बेंडाळे, भूषण धांडे, बहऱ्हाटे सर राजू इंगळे सरजू होले, संदीप चौधरी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित निवेदन देऊन आयटीआयच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा तसेच आमचे म्हणणे शासनापर्यंत पोचवावे अशी आर्त हाक ह्या वेळेस देण्यात आली. तसेच दिनांक १/११/२०२१ रोजी दिल्लीवरील मोर्च्याची कल्पना दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज