fbpx

निराधारांना मिळणार आधार : राष्ट्रवादीच्या योगिता पाटील यांचे आमदारांना निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । संजय गांधी निराधार योजनेच्या नवनिर्वाचित सदस्यपदी सौ.योगिता देवकांत पाटील यांची नियुक्ती होताच त्यांनी आमदार शिरीष चौधरी यांना निवेदन देवून या योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात संजय गांधी निराधार योजनेत श्रावणबाळ व अपंग लाभार्थी यांना वयाचा दाखला व वैद्यकीय प्रमाणपत्र दाखला यावल येथून मिळवे असे विनंती केली आहे. कारण ज्या नागरिकांकडेकडे जन्मदाखला नाही लिव्हिंग सर्टिफिकेट नाही व जे लोक अपंग नागरिक आहेत त्यांना वैद्यकीय प्रमाणात मिळवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी जळगाव यांच्याकडे जावे लागते. त्यासाठी नागरिकांची धावपळ होऊन वेळ व पैसा खर्च होतो, असेही त्या म्हटले आहे.

mi advt

तसेच होणारा त्रास व गैरसोय टाळण्यासाठी करिता यावल ग्रामीण रुग्णालयात वयाचे व अपंग व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणात पत्र मिळावे म्हणून निवेदन देत विनंती केली. सौ योगिता देवकांत पाटील यांनी निराधार महिलांना आव्हान करत या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना कसा मिळेल यासाठी समाजातील सर्वच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घ्यावा व अनाथ व अपंग व निराधाराना मदत करावी. असे आवाहन योगिता पाटील यांनी केले.

यांची होती उपस्थिती :

याप्रसंगी निवेदन देतांना सौ योगिता पाटील यांच्यासह कविता पाटील, वाढोदा गावचे सरपंच तथा संजय गांधी समिती सदस्य संदीप सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय गांधी समिती सदस्य दिनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे, राष्ट्रवादी उंटावदचे सोसायटीचे चेअरमन शशिकांत पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा विरावली ग्रा. प सदस्य ऍड देवकांत पाटील, राष्ट्रवादी युवकचे युवा नेते राजेश कारंडे यांचे सह अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

निवेदन देण्यापूर्वी यावल येथील खरेदी-विक्री संघात कार्यसम्राट माननीय आमदार शिरिष चौधरी यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष शेखर पाटील व समितीच्या सर्व सदस्यांना आशीर्वाद रुपी अभिनंदन करत पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज