fbpx

एरंडोल तालुका काँग्रेसचे कृषी केंद्राची चौकशी करण्याबाबत निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । एरंडोल येथील श्री.बालाजी कृषी केंद्र या दुकानाची चौकशी करुन कारवाई होण्यासाठी एरंडोल तालुका काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात या दुकानाचे परवाना धारक हे कमलेश गोपीचंद बियाणी असून एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे त्यांच्या भावाच्या नावावर ( श्री . सागर शालीग्राम बियाणी ) यांचे देखील बालाजी अॅग्रो या नावाने कृषी केंद्र आहे.बियाणी यांनी त्यांच्या दुकानातून बऱ्याचदा बोगस बियाण्यांची विक्री केलेली असून त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले असल्याचे म्हटले आहे तसेच संबंधीत दुकानदार हे नेहमीच दुकानात काळाबाजार करीत असतात.

आता मे महिन्यामध्ये शेतकरी कापसाची लागवड करीत असल्याने ते पुन्हा बोगस बियाणे व खते विक्री करण्याची दाट शक्यता असल्याने आपण त्याच्या दुकानावर जावून विकीसाठी ठेवलेले बियाणे, औषधी व खते प्रमाणित आहेत किंवा नाही याची खात्री करावी . तसेच त्यांच्या खतांचा स्टॉक देखील घ्यावा अशी विनंती . शेतकरी वर्गातर्फे करण्यात येत असल्याचे देखील म्हटले आहे.त्याचप्रमाणे दुकानदारांकडून पुन्हा फसगत होणार नाही या करीता तक्रारी अर्ज दिला असल्याचे शेवटी म्हटले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज