fbpx

 रस्त्यांवर मुरुम टाकण्यासाठी दिले निवेदन

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । एरंडोल येथील प्रभाग क्र.७ मधील नवीन वसाहतीत कच्च्या रस्त्यांवर मुरुम टाकण्यासाठी एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांना सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बिऱ्हाडे व रहिवाशांनी दिले.

निवेदनात प्रभाग क्र.७ मधील नविन वसाहती हिंगलाज कॉलनी, न्यु.लक्ष्मी नगर,शंकर नगर,गणपती नगर,न्यु.साईबाबा नगर,प्रभा नगर याठिकाणी पावसामुळे सर्वत्र मोठ्याप्रमाणावर खड्डे पडुन पानी साचलेले असते.त्यामुळे रहिवाशांना मोठ्याप्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे तर सदर रस्त्यांवर मुरुम टाकावा अशी विनंती करण्यात आली आहे.

mi advt

निवेदनावर ईश्वर बिऱ्हाडे,दिपक पाटील,ज्ञानेश्वर ताडे,संभाजी शिंपी,गनी टकारी,भागवत आरखे,अनिल महाजन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज