fbpx

यावल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष व निरिक्षक विनय भोइटे यांनी घेतली कार्यकर्ता संवाद भेट

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१।  काही महीन्यात राज्यात होवु घातलेल्या नगर परिषद , पंचायत समिती आणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक विनय भोईटे हे यावल येथे आले होते .

यावेळी कार्यालयात भोइटे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद भेट घेतली असता पक्षाच्या वतीने रावेर लोकसभा जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका पातळीवरील संघटनात्मक बांधणी पक्षाच्या माध्यमातुन सक्रीय पदाधिकारी आणी कार्यकर्ते हे करीत असलेल्या विविध जनहित आणी समाजहितांच्या मुद्दांवर चर्चा करून कामाचा सविस्तर आढावा घेतला या प्रसंगी बैठकीत जनहित विभागाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षबांधणीसाठी केलेल्या व करीत असलेल्या कार्याचा आर्वजुन उल्लेख केला व पुढे ही आपण पक्षाच्या वाढीसाठी अग्रभागी राहाल असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी बैठकीस उपस्थित सक्रिय कार्यकर्ते श्याम पवार उपाध्यक्ष, किशोर नन्नवरे शहराध्यक्ष ,अजय तायडे, अबिद कच्ची विभाग अध्यक्ष, गौरव कोळी विद्यार्थी सेना, राज शिर्के, विपुल येवले .प्रतिक येवले, अनिल सपकाळे इत्यादी उपस्थित होते. दरम्यान पक्षाशी एकनिष्ठ राहुन राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी खऱ्या अर्थाने वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना महत्व दिले जाणार असल्याचे मत जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केलीत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज