⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

राज्यस्तरीय स्टेनोग्राफर्स संमेलन 2 जानेवारीला ऑनलाईन होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । शॉर्टहँड अर्थात लघुलेखन कलेमूळे प्रशासन गतीमान होते. न्यायालये, विविध कार्यालये, संस्थामध्ये स्टेनोग्राफर्स यांचे अनन्य साधारण महत्व आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात पडलेला आहे. स्टेनोग्राफर्स कलेवरही त्याचा प्रभाव जाणवतो. नवीन तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहात या कलेचे महत्व, भविष्यातील आव्हाने आणि संधी विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन प्रथमच ऑनलाईन पद्धतीने केले आहे.

शॉर्टहँड कलेचे जनक आइजॅक पिटमन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रथमच ऑनलाईन राज्यस्तर स्टेनोग्राफर्स संमेलनाचे आयोजन रविवार दि. 2 जानेवारी 2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या लघुलेखकांनी हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या संमेलनात विविध कार्यालयात स्टेनोग्राफर अर्थात लघुलेखक प्रशासनाचा मुख्य आधार म्हणून ओळखला जातो. न्यायालय, विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये, खाजगी, सहकारी, शैक्षणिक संस्थांमधील स्टेनोग्राफर्स तसेच हा अभ्यासक्रम करीत असलेल्या व करु इच्छिणाऱ्या विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

या वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार
१ ) हेमराज पाटील, पुणे वरीष्ठ शॉर्टहँड शिक्षक आणि उच्चश्रेणी लघुलेखक, धर्मदाय आयुक्त कार्यालय, पुणे
विषय : शॉर्टहँड कला विकास, विस्तार आणि महत्व.

२ ) ऍड.दिलीप देशपांडे, वरीष्ठ स्वीय सहायक, वन विभाग, नागपूर
तथा सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट मोफुसील स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूर
विषय : स्टेनोग्राफर्स संघटनेचा प्रवास.

३ ) डॉ. सोहन चवरे, उच्चश्रेणी लघुलेखक, जिल्हा परिषद, नागपूर
तथा सचिव, महाराष्ट्र स्टेट मोफुसील स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूर
विषय : लघुलेखकांचे प्रश्न आणि संघटनात्मक कार्य.

४ ) दत्तात्रेय नारायण वेटकोळी, मुंबई मुख्य सचिवांचे वरिष्ठ स्वीय सहायक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई,
विषय: माझा लघुलेखनाचा प्रवास : शॉर्टहँड मध्ये यशस्वी होण्याची तंत्र आणि मंत्रे

५ ) उध्दव आढे, उच्चश्रेणी लघुलेखक, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद
तथा आयटी सेल राज्यस्तरीय प्रकल्प संचालक, महाराष्ट्र स्टेट मोफुसील स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूर,
विषय : नवतंत्रज्ञान आणि शॉर्टहँड कलेचे भविष्य.

संमेलन ऑनलाईन पद्धतीने असणार असून www.youtube.com/c/infotech4me या युट्यूबचैनलवर लाईव प्रसारण केले जाणार आहे.

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन ऑनलाईन झुम ऑपच्या माध्यमातून होणार असून त्यासाठी ही लिंक आहे. तरी सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. सोमनाथ वडनेरे समन्वयक, राज्यस्तरीय स्टेनोग्राफर्स संमेलन यांनी केले आहे.

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कबचौउमवि, जळगावचे स्विय सहायक, प्रज्ञा टोणगांवकर, गुलाबराव बोरसे, चित्रांगा चौधरी, जितेंद्र गोहिल, उच्च श्रेणी लघुलेखक चंद्रकांत नेरपगार, रेखा तायडे, प्रकाश वसावे, भागवत बडगुजर, रुपेश धुमाळ, संतोष गव्हाले, प्रमोद चव्हाण, निम्न श्रेणी लघुलेखक, दिपक अलाहित, डॉ. सोमनाथ वडनेरे, गुलाब पाटील, राजेश बगे, ईश्वर सामुद्रे, जगदिश शिवदे, महेश पाटील, मिताली देशमुख, रमेश गांगुर्डे, डॉ. महेंद्र महाजन, गजानन सावळे, आय.वाय.पठाण, सुरेश ढाके, सुनिल पारिसकर आदि परिश्रम घेत आहेत.

हे देखील वाचा :