कवयित्री ललिता पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । २६ डिसेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या तेजभूषण फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा नुकतीच झाली. यात खान्देशातून हिरापूर येथील माहेर व पाचोरा येथील रहिवासी लेखिका, कवयित्री ललिता संजय पाटील यांना राज्यस्तरीय काव्य-ललिता पुरस्कार महाराष्ट्र घोषित करण्यात आला. याबाबतचे पत्र त्यांना संस्थापक अध्यक्षा तेजस्विनी भगीरथ यांनी नुकतेच पाठवले आहे.

वाशीम येथील तेजभूषण फाउंडेशनच्या २६ डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय संमेलनात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कवयित्री ललिता पाटील या खान्देश साहित्य संघाच्या पाचोरा तालुकाध्यक्षा आहेत. तसेच विविध साहित्य संघटनेच्या त्या लेखिका आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज