राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । मागील दीड वर्षापासून कोरोनाचे सावड कायम असल्यामुळे वेगवेगळ्या निवडणुका लांबल्या. सध्या मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. याच कारणामुळे आता वेगवेगळ्या निवडणुकांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, आता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं निवडणूक कार्यक्रम केला जाहीर केला असून 5 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. राज्यातील एकूण 264 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. आदेशानंतर आजपासून (22 ऑक्टोबर) मतदार याद्या तयार करून सहकारी निवडणूक प्राधिकरणाला देण्याची सूचना संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता आगामी काळात राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. स्थानिक नेते राजकीय समिकरण जुळवण्यासाठी डावपचे आखण्यास सुरुवात करणार आहेत. तसेच राज्य पातळीवरच्या नेत्यांचेसुद्धा बाजार समितीच्या निवडणुकीकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात राजकीय आखाडा चांगलाच रंगणार आहे.

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज