चौगाव शिवारातून स्टार्टर ऑटोस्विच चोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । चोपडा तालुक्यातील चौगाव येथील शेतकरी विश्राम सुकदेव धनगर(तेले) यांच्या मालकीच्या चौगाव शिवारातील गट नं.४४५/२ या शेतातून दि.१९ एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरांनी ईलेक्ट्रीक पोलला बसवलेल्या पत्री पेटीतून कुलूप तोडून स्टाटर, अँटोस्विच, फ्युज, पकड, पेचिंस ईत्यादी सुमारे पाच ते सहा हजार रुपयाचे साहित्य चोरून नेले.

दि.२० एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता विश्राम धनगर मोटर चालू करायला गेले असता सदरचा प्रकार लक्षात आला. सर्व शेजारींना विचारपूस केली असता त्यांनाही सदर प्रकार माहीत नसल्याचे सांगितल्या नंतर विश्राम तेले यांनी पोलिस पाटिल गोरख हरचंद पाटिल यांना सदर प्रकार दुरध्वनीवरून सांगितला व त्यांच्या सांगण्यानुसार चोपडा ग्रामिण पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.

सदर अद्ण्यात चोरांविरूद्ध कलम ३७९ नुसार २०/४/२०२१रोजी सकाळी १०:४५ मिनीटांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास हवलदार संजय निंबा यदे हे करत आहेत.

चौगाव परीसरात भुरट्या चोर्या जास्त होत असून त्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी विश्राम तेले यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप सहदेव आरक यांच्याकडे केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज