पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करा : खा. रक्षा खडसे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने व केंद्र शासनाने रेल्वेचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद केला होता. यामुळे अपडाऊन करणार्‍या नागरिकांचे चांगलेच हाल होत होते. मात्र ज्या प्रकारे लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे त्याच प्रकारे. जळगाव जिल्ह्यातील पॅसेंजर ट्रेन सुद्धा पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
येत्या काळात कॅबिनेट मीटिंग मध्ये हा मुद्दा मांडावा अशी मागणीही यावेळी रक्षा खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली.

याचबरोबर शाळा सुरू झाले आहे त्यामुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी जिल्ह्यामध्ये एसटी सेवा सुरू करावी अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी केली होती. यावेळी पालकमंत्र्यांनी तात्काळ एसटी सेवा सुरु करावी असे आदेश एसटी विभागाला दिले आहेत.

महाजन यांचा राज्य शासनाला अप्रत्यक्ष टोला
ज्यावेळी रक्षा खडसे यांनी हा मुद्दा नियोजन समितीच्या पटलावर मांडला त्या वेळेस माझं मिश्किलपणे म्हणाले की तुम्ही आमचे मंदिर देखील बंद केली आहेत त्याचबरोबर असंख्य गोष्टी बंद केले आहे त्यामुळे आम्हाला तुम्हाला बंद करून ठेवायचा आहे का हे तुम्हीच ठरवा. यामुळे सभागृहात एकच हशा फुटला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -