fbpx

चाळीसगाव-धुळे व नाशिक-भुसावळ पॅसेंजर तत्काळ सुरू करा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । चाळीसगाव धुळे व नाशिक भुसावळ पॅसेंजर तत्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी करत अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष मुकेश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या वतीने काल खासदार उन्मेष पाटील यांचे सहाय्यक नरेंद्र जैन व अर्जुन परदेशी यांना निवेदन देण्यात आले आहे.

बऱ्याच कालावधीपासून दोन्ही पॅसेंजर बंद आहे त्या कारणाने अनेक गोरगरीब जनतेचे व रोज अप-डाऊन करणाऱ्या नोकरदारांचे अतोनात हाल होत असल्याकारणाने कृपया लवकरात लवकर या विषयावर सहानुभूतीपूर्वक विचार करून गाडी सुरू करण्यास प्रयत्न करावे असे समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष श्री.मुकेश गोसावी,जिल्हा सचिव रावसाहेब जगताप, महिला तालुका अध्यक्ष सौ.संगीता गवळी, जिल्हा निरीक्षक गणेश जाने,जिल्हा संपर्कप्रमुख रमेश बैरागी, गणेश गोसावी, तालुका उपाध्यक्ष गुलाब पाटील, इस्माईल सुलेमान खाटीक, बिस्मिल्ला हजरत नूर, मुस्ताक शेख संजय मांडोळे, मुमताज बॅग, प्रसिद्धीप्रमुख नितीन भदाणे, महिला शहर प्रमुख जयश्री कुलकर्णी, उपतालुका प्रमुख महिला अरुणा खरात,रफीक खान या सर्वांनी निवेदन पत्रावर सह्या करून निवेदन दिले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज