तरुणावर चाकूने वार; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । शहरातील मेहरुण येथे घरासमोर अंगणात उभ्या असलेल्या तरुणाने हातात चाकू धरण्यास नकार दिल्याने त्याच चाकूने तरुणावर वार करुन त्याला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. रेहान खान महमूद खान ( वय २१,)  असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रेहान याने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, मेहरुण परिसरातील मिल्लत मशिदीसमोर रेहान खान महमूद खान ( वय २१,) हा तरुण कुटुंबासह राहतो. सोमवारी दुपारी रेहान अंगणात उभा असतांना, आरिफ शहा व त्याच्यासोबत इतर दोघे जण आले. त्यांनी त्यांच्याकडील चाकू रेहान यास हातात पकडण्याचे सांगितले. रेहानने नकार दिला असता, आरिफ शहान याने त्याच चाकूने डोळ्याखाली वार केले. तर इतर दोघांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.

रेहान याने दिलेल्या तक्रारीवरुन आरिफ शहा, काल्या ( पूर्ण नाव माहित नाही ), बंदर पूर्ण नाव माहित नाही तिघे रा. सालारनगर अशा तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज