एसटीचा संप सुरूच : नऊ चालक, तीन वाहकांच्या बदल्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । एसटी कर्मचाऱ्यांचा महिनाभरापासून संप सुरू आहे. शासनाकडून कर्मचाऱ्यांना आवाहन केले जात असतून तरीही अद्याप काही कर्मचारी संपाच्या पवित्र्यात आहेत. या संपामुळे प्रशासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जळगाव विभागातील ९ चालक, ३ वाहक अशा एकूण १२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.
जळगाव विभागातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये (कर्मचाऱ्याचे नाव, त्यानंतर सध्या कार्यरत ठिकाण व कंसात बदली झालेले ठिकाण)  सचिन माळी, जळगाव (रावेर येथे बदली), हिलाल पाटील, जळगाव (रावेर), कांतिलाल जैन, यावल (पाचोरा), अल्ताफ खॉ, चाळीसगाव (भुसावळ), रावसाहेब शिंदे, अमळनेर (जामनेर), महेंद्र माळी, चोपडा (रावेर), दिवाकर राजगडकर, जामनेर (अमळनेर), काशिनाथ कोळी, रावेर (चोपडा), नीलेश जैस्वाल, मुक्ताईनगर (एरंडोल), नितीन पाटील, पाचोरा (यावल), मुकुंदा कोळी, भुसावळ (चाळीसगाव), दिलीप कंखरे, एरंडोल (मुक्ताईनगर) यांची बदली करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar