एसटीच्या कर्मचाऱ्यांनी‎ मागितली राज्यपालांकडे‎ स्वेच्छा मरणाची परवानगी

बातमी शेअर करा

‎जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । शहर आगारातील बस संपकरी‎ एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी‎ जिल्हाधिकारी व तहसीलदारांना‎ निवेदन देत राज्याचे राज्यपाल भगतसिंग‎ कोश्यारी यांच्याकडे स्वेच्छा‎ मरणाची परवानगी मागितली आहे.

‎निवेदनात म्हटले आहे की,‎ एसटी कर्मचाऱ्यांची मानसिक‎ स्थिती योग्य नाही. महाराष्ट्रातील‎ शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत‎ एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती‎ वाईट आहे. तुटपुंजे वेतन व‎ मानसिक त्रासामुळे अनेक एसटी‎ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या‎ आहेत. आत्महत्या करणे कायद्याने‎ गुन्हा असल्याने सर्व एसटी‎ कर्मचाऱ्यांनी राज्यपालांकडे स्वेच्छा‎ मरणाची परवानगी मागितली आहे.‎ राज्याचे प्रमुख म्हणून एसटी‎ महामंडळाचे राज्य शासनात विलीन‎ करून राज्य सरकारी‎ कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार‎ पदनिहाय वेतनश्रेणी देण्याची मागणी‎ केली आहे. निवेदनावर २००हून‎ अधिक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या‎ आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात‎ निवेदन दिले आहे.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar