चाळीसगाव येथे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी दरेकरांनी दिली भेट

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत ऐन  दिवाळी सणाच्या तोंडावर संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे प्रवाशांसह आता विद्यार्थ्यांचेही हाल हाेत आहेत. २० दिवस हाेऊनही संप मिटलेला नाही. दरम्यान, २७ रोजी धुळे, दोंडाईचाला जात असताना राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देत चर्चा केली.

दरम्यान, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मात्र, तुमचा निर्णय एकमुखी राहू द्या. तसेच तुमच्या संघटनेत फूट पडणार याचीही काळजी घ्या, असे आंदाेलनकर्त्या कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यावर आम्ही न्याय्य मागण्यांसाठी लढत आहोत. मात्र, आम्हाला सस्पेंड करण्यात येत आहे. त्यावर हे महाविकास आघाडी सरकार बिनकामाचे असून आता आपण सर्व मिळून या तिघाडी सरकारलाच सस्पेंड करू या. तुमचे आंदोलन सुरू ठेवा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वासन दरेकरांनी कर्मचाऱ्यांना दिले. याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण हेही उपस्थित होते.

बातमी शेअर करा
- Advertisement -

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar