पाचोरा येथील श्रीस्वामी समर्थ मठ दिव्यानी उजळले

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ ।  त्रिपुरारी पौर्णिमेनिम्मित पाचोरा शहरातील प्रसिद्ध श्रीस्वामी समर्थ मठ ५११ दिव्यांनी उजळले. यावेळी भक्तांनी स्वतः देखील मठा मध्ये दिवे प्रज्वलीत करून स्वामी समर्थ्यांचे दर्शन घेतले.

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात ( उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात ) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. बौद्ध धर्मात असे मानले जाते की, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात.

सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज