कोळी क्रिकेट लिग स्पर्धाला सुरवात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ ।  शिवतीर्थ मैदान येथे आयोजित कोळी क्रिकेट लिगच्या दुसऱ्या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. यात दहा संघानी प्रवेश घेतला असून, ही स्पर्धा १० ते १२ डिसेंबर पर्यंत सुरु राहील.यावेळी महर्षि वाल्मिकी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने तसेच शहिदांना आदरांजली देत स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

पहिला सामना अंजली ट्रॅक्टर विरुद्ध माँ संघाशी झाला. यात अंजली ट्रॅक्टरला ६७ धावांचे माफक आव्हान सहा षटकात पूर्ण केले.दुसऱ्या सामन्यात सोनवणे वॉरियर संघाने हुप पहिलवान संघांवर ४१ धावांनी विजय मिळविला.

यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे,कोळी महासंघ अध्यक्ष रमेश पाटील,नगरसेवक कैलास सोनवणे,प्रभाकर सोनवणे,जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष शामकांत सोनवणे,शिवसेना महानगर अध्यक्ष शरद तायडे,सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे,सागर सोनवणे,डॉ.अश्विन सोनवणे,राहुल ठाकरे,डॉ.परीक्षेत बाविस्कर, सागर सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विनोद तायडे,राहुल ठाकरे,इंजि.राहुल सोनवणे,दिनेश सोनवणे आदी उपस्थिती होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar