fbpx

प्रवाशांसाठी खुशखबर: रेल्वेच्या ‘या’ विशेष गाड्या धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जुलै २०२१ । देशात अनलॉक सुरु असून या दरम्यान अनेक रेल्वे गाड्या सुरु करण्यात येत आहेत. दरम्यान,  प्रवाशांची वाढती संख्या लक्ष्यात घेता भुसावळ-हजरत निजामुद्दीन, मुंबई-बरेली साईनगर शिर्डी-कालका दरम्यान विशेष गाड्या धावणार आहे.

गाडी क्रमांक ०४०६३ विशेष द्वि-साप्ताहिक ११ जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत भुसावळ येथून दर मंगळवार आणि रविवारी ०६.०० वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीनला दुसऱ्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल.

mi advt

०४०६४ विशेष द्वि-साप्ताहिक ९ जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत हजरत निजामुद्दीन येथून दर शुक्रवार आणि रविवारी १५.०५ वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी १५.०५ वाजता पोहोचेल.

थांबे : मध्य रेल्वेवर मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, नागपूर, पांढुर्णा, मुलताई, आमला, बैतूल, घोराडोंगरी.

लोकमान्य टिळक टर्मिनस-बरेली विशेष साप्ताहिक

०४३१३ विशेष साप्ताहिक १२ जुलैपासून पुढील सुचनेपर्यंत टिळक टर्मिनस, मुंबई येथून दर सोमवारी ०८.०५ वाजता सुटेल आणि बरेलीला दुसऱ्या दिवशी १५.२९ वाजता पोहोचेल.

०४३१४ विशेष साप्ताहिक १० जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत बरेली येथून दर शनिवारी ११.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल.

साईनगर शिर्डी- कालका विशेष द्वि-साप्ताहिक

०४५६५ विशेष द्वि-साप्ताहिक १० जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत साईनगर शिर्डी येथून दर मंगळवार आणि शनिवारी १०.०० वाजता सुटेल आणि कालका येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.

०४५६६ विशेष द्वि-साप्ताहिक ८ जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत कालका येथून दर गुरुवारी आणि रविवारी १७.२० वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी १८.४० ​​वाजता पोहोचेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज