प्रवाशांनो लक्ष द्या : दिवाळी, छटपूजेसाठी ‘या’ विशेष गाड्या धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । दिवाळी, छटपूजा सणांसाठी प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी पाहता मध्य रेल्वेने नागपूर व करमळी, मुंबई तसेच पुणे व भगत की कोठी दरम्यान विशेष उत्सव रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. भुसावळ विभागातील प्रवाशांना याचा लाभ होईल.

नागपूर-करमळी साप्ताहिक सुपरफास्ट
नागपूर-करमळी साप्ताहिक सुपरफास्ट (०१२३९) ही गाडी ३० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर पर्यंत दर शनिवारी नागपूर येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता करमळी येथे पोहोचेल. ०१२४० विशेष उत्सव रेल्वे ३१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर पर्यंत दर रविवारी करमळी येथून रात्री ८.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

थांबे : वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी या स्थानकांवर थांबा आहे.

मुंबई- नागपूर विशेष अतिजलद साप्ताहिक

मुंबई- नागपूर विशेष अतिजलद साप्ताहिक ०१२४७ गाडी २९ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर शुक्रवारी रात्री १०.५५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.१० वाजता पोहोचेल. ०१२४८ गाडी ३० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर पर्यंत दर शनिवारी नागपूर येथून सायंकाळी ५.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. कल्याण, इगतपुरी (फक्त ०१२४८ साठी), नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबा आहे.

पुणे-भगत की कोठी साप्ताहिक गाडी

पुणे-भगत की कोठी ही साप्ताहिक विशेष गाडी (०१२४९) २२ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर पर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून रात्री ८.१० वाजता सुटून आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.५५ वाजता भगत की कोठी येथे पोहोचेल. तर ०१२५० साप्ताहिक विशेष २३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर पर्यंत भगत की कोठी येथून रात्री १०.२० वाजता सुटून आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.०५ वाजता पुणे येथे पोहोचेल.

थांबे : लोणावळा, कल्याण, वसई रोड, सूरत, वडोदरा, अहमदाबाद या स्थानकांवर थांबा आहे.

पूर्णतः आरक्षित असलेल्या विशेष रेल्वे गाड्या अनुक्रमे ०१२३९, ०१२४७, ०१२४८ आणि ०१२४९ साठी विशेष शुल्कासह १८ ऑक्टोबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर बुकिंग सुरू झाले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज