fbpx

एसपींनी घेतला बोदवड पोलीस स्टेशनचा वार्षिक आढावा

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ ऑक्टोबर २०२१ । बोदवड पोलीस स्टेशनला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांसह पोलीस स्टेशनचा वार्षिक आढावा घेतला.

या वार्षिक आढावा बैठकीच्या निमित्ताने पोलिस स्टेशनचे सुशोभीकरण व नुतनीकरणाचा कार्यक्रम जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोदवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरी व जनतेकडून होत असलेल्या सहकार्य याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी बोदवड पोलीस स्टेशन सुशोभीकरण व नुतनीकरणाचा कार्यात सहभाग नोंदविणाऱ्या व्यक्तींचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार सत्कार करण्यात आला.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज