येत्या चार दिवसात सोयाबीन तेलाचे भाव वाढणार, जाणून घ्या किती रुपयाने वाढणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । गेल्या काही महिन्यात खाद्य तेलांच्या किंमती गगणाला भिडले असून खाद्य तेलांचे दर आवाक्यात आणण्यासाठी केंद्राकडून विविध पाऊले उचलली जात आहे. त्यात प्रामुख्याने आयात शुल्कात घट केल्याने सर्वच तेलांच्या दरात घसरण झालेली आहे. सर्वाधिक सवलत साेयाबीनला मिळाल्याने साेयाबीन तेलाचे दर अधिक कमी झाले. मात्र, येत्या तीन ते चार दिवसात साेयाबीन तेलाचे दर वाढणार असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे.

कारण घाऊक व्यापाऱ्यांनी उत्पादकांकडे मागणी कमी नाेंदवली आहे. परिणामी साेयाबीन तेलाचे तीन ते चार रुपयांनी वाढू शकतात. सध्या जळगावात सोयाबीन तेलाच्या दर १३७ ते १४० रुपयांपर्यत आहेत. तर शेंगदाण्याच्या दरातही घसरण झाली असून १६५ ते १७० रुपये प्रति लिटरवर दर पोहोचले आहेत.

कोरोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच महागाईचा भडका उडाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. दिवाळी सारखा सणासुदीचा काळ असल्याने प्रत्येकाला खर्च अपेक्षित आहे. दिवाळीत फरसाण व इतर साहित्य बनविण्यासाठी खाद्य तेलाचा सर्वाधिक वापर केला जातो. मात्र खाद्य तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले आहे. गेल्या काही दिवसात सोयाबीन तेलाच्या किमतीत चांगलीच वाढ झाली होती.

गेल्या दोन ते अडीच महिन्यापूर्वी सोयाबीन तेलाचे दर १६५ ते १७० रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने आयात शुल्कात कपात केल्याने सर्वच तेलांचे भाव काहीसे स्वस्त झाले होते. सध्या सोयाबीन तेलाचा भाव १४० रुपये प्रति किलो पर्यंत विकले जात आहे. मात्र, सतत तेलाच्या दरात हाेणारी वाढ व घसरणीमुळे घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी उत्पादकांकडे मागणी नाेंदविलेली नाही. त्यामुळे आगामी चार ते पाच दिवसात बाजारपेठेत असलेली मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण हाेऊन तुटवडा भासण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे. तेलाची दरवाढ झाल्यास ऐन सणावारात सर्वसामान्यांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे.

गरजेपुरती खरेदी करा, साठा टाळा
इतर तेलाच्या तुलनेत केवळ साेयाबीन तेलाच्या दरात तीन ते चार रुपये प्रती किलाे वाढ हाेण्याची शक्यता आहे. ही वाढ तात्पुरती असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तेलाचे दर अजून वाढतील या भीतीने ग्राहकांनी विनाकारण तेलाची खरेदी करुन साठा करू नये. जेवढी आवश्यकता तेवढेच खरेदी करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

आवक वाढल्याने उत्पादन वाढणार

साेयाबीन तेलबियांच्या तुटवड्यामुळे त्यांच्या दरात वाढ झाली हाेती. परंतु अायात शुल्क कपात केल्याने मालाची आवक वाढली. साठा केलेला मालही बाजारात आला. पावसाने उघडीप दिल्याने बियाणे सुकून ते तेलाचे उत्पादन करण्यासाठी याेग्य झाले आहे. त्यामुळे आगामी काळात उत्पादनात वाढ हाेण्याची शक्यता आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज