⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरीची उत्तम संधी, ३,३७८ पदांसाठी भरती

दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.  दक्षिण रेल्वेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. दक्षिण रेल्वे 3,378 पदे भरती करत आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 आहे. या पदांवर भरतीसाठी दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी sr.indianrailways.gov.in वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

पदांचा तपशील

कॅरेज वर्क्स, पेरंबूर – 936 जागा

गोल्डनरोक वर्कशॉप – 756 जागा

सिग्नल अँड टेलिकॉम वर्कशॉप, पोदानूर – 1686 जागा

रिक्त पदांची एकूण संख्या-3378 जागा

शैक्षणिक पात्रता : 

फिटर, पेंटर आणि वेल्डर या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह दहावी (मॅट्रिक) उत्तीर्ण केलेली असावी. मेडिकल लॅब टेक्निशियन (रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, कार्डियोलॉजी) पदांसाठी अर्ज करण्यासाठी पदवी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात किमान 50० टक्के गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण असावी. तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अभ्यासक्रम पास केलेला असावा.

वयाची मर्यादा?

कमीत कमी वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्‍यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील केलेली आहे. फ्रेशर्स, आयटीआय आणि लॅब टेक्निशियन यांच्यासाठी वायीच अट 22 वर्ष आहे.

परीक्षा फी : 100 रुपये /- (एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही)

अशी होणार निवड

EX ITI प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड दहावी व आयटीआय मध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. त्याचबरोबर एमएलटी पदासाठी बारावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२१

अधिकृत संकेतस्थळ : sr.indianrailways.gov.in