fbpx

10 वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

mi-advt

१० वी पास असलेल्या तरुणांसाठी नोकरीची एक उत्तम संधी चालून आलीय. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 339 अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. या जागा 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहेत.  या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे. ही भरती रेल्वेच्या विविध विभागांसाठी आहे.

पदांची नावं

१. वेल्डर
२. सुतार
३. फिटर
४. इलेक्ट्रीशियन
५. स्टेनो
६. वायरमन
७. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
८. मेकॅनिक डिझेल

पात्रता :

दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेड/क्षेत्रातील ITI प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

01 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

निवड प्रक्रिया :

10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज अधिकृत वेबसाईट apprenticeship.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

भरतीसंदर्भातील जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज