fbpx

सोनी टिव्हीवरील ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात यजूर्वेंद्र महाजन होणार सहभागी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२१ । सोनी टिव्हीवरील “कोण होणार करोडपती” हा कार्यक्रमत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती स्पर्धक म्हणून यात सहभागी होत असतात. मात्र, सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तींना कर्मवीर या विशेष भागात निमंत्रित केले जाते. या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचते. या कार्यक्रमासाठी दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांना निमंत्रित केले गेले आहे.

येत्या शनिवारी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासोबत ते सहभागी होणार आहे. कार्यक्रमात जिंकलेली रक्कम ते दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल प्रकल्पाच्या बांधकामासाठी देणार आहेत. कुसुंबा, जळगाव येथे तीन एकर जागेत दिव्यांग व्यक्तींच्या गरजेनुसार अक्सेसीबल पद्धतीने लोकसहभागातून बांधकाम सुरू आहे. 70% बांधकाम पूर्ण झाले आहे

दीपस्तंभ फॉउंडेशनच्या मनोबल प्रकल्पात भारतातील दीव्यांग, अनाथ, वंचित घटकातील विद्यार्थ्याना निःशुल्क निवासी स्पर्धा परीक्षा , उच्च शिक्षण, तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले जाते.22 राज्यातील विद्यार्थी विविध कोर्सेससाठी ऑनलाईन तसेच निवासी प्रशिक्षण घेत आहे.

वंचित विद्यार्थ्याना गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रशिक्षण मिळावे या उद्देश्याने जळगाव व पुणे येथे ही संस्था कार्यरत आहेत. संस्थेचा माध्यमातून तळागाळातील हजारो विद्यार्थ्याना विविध क्षेत्रांत उत्तम काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यासोबतच १५ लाख विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून त्यांना प्रेरणा व मार्गदर्शन देण्याचे कार्य यजुर्वेंद्र महाजन यांनी केले आहे. ‘ कोण बनणार करोडपती’ या कार्यक्रमासाठी “कर्मवीर” या भागासाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सहभागी होणारे यजूर्वेंद्र महाजन हे पहिले खान्देशवासी आहेत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज