पत्रकार संरक्षण सेना संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सोनू चौधरी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । माहीती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना ( महाराष्ट्र राज्य) जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सोनू चौधरी यांची निवड करण्यात आली. ही निवड आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक डॉ.अविनाश संकूडे, राष्ट्रीय अध्यक्ष  कैलास पठारे यांच्या अनुमतीने तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम हनुमान जांभूळकर याच्या आदेशाने जळगाव जिल्हा अध्यक्ष पदावर निवड केले आहे.

दरम्यान, या निवडीमुळे संघटनेच्या मित्र परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, संघटनेच्या पदाधिकारी व मित्र परिवार यांनी सोनू भट्टू चौधरी यांचा मनपूर्वक अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांना समोरच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. संघटनेच्या माध्यमातून सन्मान आणि कर्तव्य निष्ठेचे पालन करुन योग्य कायद्याच्या चौकटीत राहून न्याय देण्यासाठी अथक परिश्रम घेऊन कसोशीने संघटनेसाठी प्रयत्न करुन संघटनेचा नाव लौकिक करीन असे भावपूर्ण उद्धगार व्यक्त करुन आदरणीय वरिष्ठांच्या प्रती आदरपूर्वक आभार व्यक्त करून संपूर्ण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे सोनू भट्टू चौधरी यांनी धन्यवाद मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -