भुसावळ न.पा.च्या प्रभारी नगराध्यक्षपदी सोनी बारसे

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे हे अनिश्चित काळासाठी रजेवर गेल्याने त्यांचा पदाची सूत्रे उपनगराध्यक्षा सोनी बारसे यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी शुक्रवार दि.१२ रोजी नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी रखडलेल्या कामांना गती देऊ, असे आश्वासन त्यानी दिले.

नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून शेवटच्या वर्षात चार ते पाच जणांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार रमेश नागराणी, प्रमोद नेमाडे यांना संधी मिळाली. १७ ऑगस्टला नेमाडे यांनी राजीनामा दिल्याने सोनी बारसे यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली. दरम्यान, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी वैयक्तिक कारणांमुळे रजा टाकली आहे. त्यामुळे त्यांच्या पदाचा पदभार शुक्रवार दि.१२ रोजी उपनगराध्यक्षा साेनी बारसे यांनी स्वीकारला.

यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे गटाचे स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे, नगरसेवक ऍड. बोधराज चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, देवेंद्र वाणी, दिनेश नेमाडे, संतोष बारसे तर आमदार गटाचे केवळ सतीश सपकाळे उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज