fbpx

एरंडोल पोलीस स्टेशनतर्फे सैनिक पुतळा अनावरण व लॉन चे उद्घाटन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ ।  एरंडोल पोलीस स्टेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे यांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या आवारात सैनिक पुतळा अनावरण व लॉन्सचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ सचिन गोरे,उपविभागीय पोलिस अधिकारी अमळनेर उपविभाग राकेश जाधव,प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसिलदार सुचिता चव्हाण,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे उपस्थित होते.
यावेळी एरंडोल येथील पंकज काबरा एम.डी.बी.केमिकल कंपनी अध्यक्ष (कॅटा फार्मा) यांच्या कंपनी च्या सी.एस.आर.फंडातून पोलीस स्टेशनच्या आवारात सैनिक पुतळा व लॉन्स लाऊन देण्यात आले.यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे व पंकज काबरा यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे,पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे,पोलीस नाईक संदिप सातपुते,अनिल पाटील,तडवी,दिलीप कुमावत व सर्व पोलीस कर्मचारी,शहरातील मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी एरंडोल पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी,पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.यावेळी शहरातील या नूतन पोलीस स्टेशनला संरक्षक भिंत बांधली जावी अशी मागणी उपस्थितांनी केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज