एरंडोल येथील सॉप्टवेअर इंजीनियर शैलेंद्र राजपूत यांचे पुण्यात अपघाती निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । एरंडोल येथील लक्ष्मीनगरातील रहीवासी तथा पुण्याला सॉप्टवेअर इंजीनियर म्हणून कार्यरत असलेले शैलेंद्र गणसिंग राजपूत (वय-४२) यांचे बुधवारी रात्री साडेअकरा वाजता पुणे येथे अपघाती निधन झाले.

शैलेंद्र राजपूत यांच्या दुचाकीला पुणे येथील डांगे चौकात डंपरचा धक्का लागल्याने व ते डंपरच्या मागच्या चाकात आल्याने जागीच ठार झाले. ते पुणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. मित्रांना बांधून ठेवणारा आमचा मनमिळावु मित्र आम्हाला सोडून गेला, अशी हळहळ त्यांच्या मित्र परीवारातून व्यक्त केली जात आहे, त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व २ लहान मुले असा परीवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज