fbpx

मालोद येथील ग्रामसेवकाने जोपासली सामाजिक बांधिलकी

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९  मे २०२१ । तालुक्यातील मालोद येथील ग्रामसेवक राज़ु तडवी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कर्तव्य आणी समाजहीताची व माणुसकीची जाणीव ठेवत  विविध सामाजीक व विधायक उपक्रम राबवुन एक आदर्श निर्माण केले असुन त्यांनी केलेल्या प्रेरणादायी या कार्याचे परिसरात कौत्तुक केले जात आहे.

यावल पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले आदीवासी कुटुंबातील राजु अन्वर तडवी यांनी आपला वाढदिवसासाठी होणारे अनेक अनावश्यक खर्च टाळुन अतिश्य साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केल .सद्या संपुर्ण देशात आणी आपल्या राज्यात व आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणुसंसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे लागलेली सर्वत्र संचारबंदी यात अनेक हातावर पोट भरणारी कुटुंब ही रोजगार व कामधंदे अभावी आर्थिक संकटात ओढवलेली गेली आहे. अशा संकटाच्या समयी समाजाला आपले देणे म्हणुन सामाजिक कर्तव्याची जाणीव राखुन ग्रामसेवक राजु तडवी यांनी आपल्या वाढदिवसासाठी होणारे सर्व खर्च टाळुन यातुन मालोद या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी गावातील गोरगरीब व गरजु महीलांना स्वखर्चातुन वस्त्र, मास्क, आणी सेनिटाईझर वितरीत केले तसेच शासनाच्या अपंगांना पाच टक्के निधीतुन दहा अपंग महीला आणी पुरूषांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे धनादेश वाटप केलीत व आजच्या काळात सर्वाधिक अत्यंत गरजेचे असलेली पर्यावरणाचे व निसर्गाचे समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी विविध वृक्षांचे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा परिसरात वृक्षारोपण केले अशा विविध समाजहिताच्या दृष्टीकोणातुन लक्ष वेधणारे मोल्यवान कार्य करून शासनाचे सर्व नियम पाळत आपला वाढदिवस आगळ्या वेगळया उपक्रमानी साजरा करून एक आदर्श निर्माण केले आहे.

mi advt

याप्रसंगी मालोद या आदीवासी गावात संपन्न झालेल्या या आदर्श निर्माण करणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा प्रसंगी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, ग्रामपंचायंत विस्तार अधिकारी हबीब तडवी , ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव पुरूषोत्तम तळेते, ग्रामसेवक हितेन्द्र महाजन ,ग्रामसेवक बाळु वायकोळे, कोरपावलीचे अविनाश भालेराव, मालोदच्या सरपंच सौ. हसिना सिराज तडवी, उपसरपंच सौ .हुसेनाबाई रमजान तडवी , ग्राम पंचायत सदस्य सौ. जोहराबाई मुजात तडवी , बिस्मिल्ला तडवी, अरब सुभान तडवी, सौ. उषाबाई बिरम बारेला, सौ . सुनिता नंदकिशोर पाटील, संजय सुभान तडवी, अकबर बाबु तडवी, बिस्मिल्ला नथ्थु तडवी, सौ. रमाबाई बारेला यांनी या सामाजीक व विधायक उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज