….म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी यावल ग्रामविस्तार अधिकाऱ्यास बजावली नोटीस

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव हद्दीतील शासकीय जमीन हि रीतसर गांवठाणाची कार्यवाही न करता भोगवटादार  लावून गाव नमुना ८ अ तयार केल्याबाबत फैजपूर विभागाचे प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी यावल ग्रामपंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी व डोंगर कठोरा ग्रामपंचायतीस कार्यवाहीची  नोटीस बजावत तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे सांगितले आहे.

या संदर्भात प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी मागील आठवड्यात यावल पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी व डोंगर कठोरा ग्रामपंचायतीला पत्र पाठवले असून, या पत्रात असे नमूद केले आहे. की, डोंगर कठोरा तालुका यावल या गावाच्या ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमीन असलेली गावठाणची जागेची रीतसर परवानगी न घेता भोगवटादार लावून गाव नमुना ८ अ तयार केल्याबद्दल तक्रार प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने तसेच सोबत डोंगर कठोरा येथील नमुना ८ अ ची संचिका दाखल आहे. या संदर्भात प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी संबंधितांना नोटीस बजावून संपूर्ण कागदपत्रासह तीन दिवसाच्या आत हजार राहावे,अशी सूचना नोटीसद्वारे दिली आहे. सदरचा खुलासा मुद्गतीत प्राप्त न झाल्यास आपल्याविरुद्ध कायद्याशीर कार्यवाही करण्यात येईल असे नोटीसद्वारे सुचविण्यात आले आहे. यासंदर्भात प्रांत कार्यलयाकडून कुठल्या प्रकारची कार्यवाही करण्यात आली हे मात्र, गुलस्त्यातच आहे. या विषयाला घेवून डोंगर कठोरा ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी अतिशय बेजबाबदारीने वागून ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली मोठा आर्थिक व्यवहार करून शासकीय नियम धाब्यावर ठेवून हा गोंधळकृत कारभार केल्याची परिसरातील ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे. या सर्व कारभारची सीईओ व गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून सत्य काय ते समोर आणावे अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या पदिकार्यांनी तक्रारीद्वारे केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज