..तर पुन्हा लॉकडाऊन करू? काय म्हणाले नेमकं राजेश टोपे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । जगभरासह भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले असून चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात याचे जवळपास १०० रुग्ण आढळून आले असून यामुळे राज्यात नुकतेच काही निर्बंध लागू करणार आहेत.या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. शाळांबाबतही सरकार काय निर्णय घेणार असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांना उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी शाळांबाबत तूर्तासतरी सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे सध्या शाळा सुरु आहेत, तशाच त्या सुरु राहितील, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. मात्र चिमुकल्यांच्या लसीकरणाबाबत सरकारही प्रयत्नशील आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय.

तर लॉकडाऊन करू
ऑक्सिनच्या अनुषंगाने आपण लॉकडाऊन ठरवणार आहोत. ज्या दिवशी 800 मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची 800 मॅट्रीक टनाची आवश्यकता 500 मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे, असं त्यांनी सांगितलं. मात्र, ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नये. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असंही त्यांनी सांगितलं.

सध्या शाळा बंद करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. हॉटेल, रेस्टाँरंट ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. याठिकाणी एकाचवेळी खूप गर्दी होऊ नये, इतकाच उद्देश आहे. त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दी कमी राहण्यासाठी हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवल्यास त्याला आमचा विरोध नसेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -