fbpx

प्रवाशांनो लक्ष द्या : १६ व १७ जुलैला भुसावळ विभागातून धावणार्‍या ‘या’ ३६ गाड्या रद्द

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२१ । जळगाव ते भादली दरम्यान तिसर्‍या मार्गाच्या जोडणीत यार्ड रिमॉडलिंगसाठी नॉन-इंटरलॉकिंगचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणार्‍या तब्बल ३६ प्रवासी रेल्वे गाड्या (अप-डाऊन मार्गावरील मिळून) आणि १० पार्सल गाड्या १६ व १७ जुलैला रद्द करण्यात आल्या. परिणामी या  जाणार्‍या प्रवाशांचे आरक्षणही रद्द होणार आहे.  

जुलैला डाऊन आणि १७जुलैला अप साइडच्या रद्द झालेल्या प्रवासी गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) – हजरत निजामुद्दीन विशेष राजधानी एक्स्प्रेस, सीएसएमटी-नागपूर अतिजलद, एलटीटी-प्रयागराज दुरांतो, एलटीटी-आग्रा कँट अतिजलद, सीएसएमटी-नागपूर दुरांतो, सीएसएमटी-अमरावती, पुणे-नागपूर, केवडिया-रिवा, सूरत-अमरावती, नंदुरबार-भुसावळ, भुसावळ-सूरत गाडीचा समावेश आहे. 

याशिवाय पुणे-अजनी  जुलै), पुणे-अमरावती (14 जुलै), अमरावती-पुणे (15 जुलै),  (16 जुलै), अमृतसर -सीएसएमटी (19 जुलै), महाराष्ट्र एक्स्प्रेस (15 जुलै), गोंदिया-कोल्हापूर (17 जुलै), हमसफर एक्स्प्रेस (15 जुलै), हमसफर (16 जुलै), पंजाब मेल (16 जुलै),पंजाब मेल (18 जुलै), एलटीटी-हरिद्वार एसी (15 जुलै), हरिद्वार-एलटीटी एसी (दि.16) सुरत-भुसावळ (15 जुलै) व भुसावळ-सुरत (16 जुलै)  रद्द असेल. देवळाली-मुजफ्फरपूर पार्सल गाडी 17 जुलै, मुजफ्फरपूर-देवळाली  19 जुलै, सांगोला-मनमाड 17 आणि मनमाड-दौंड 20 जुलै, पुणे-दौंड 17 जुलै, दौंड-पुणे 20 जुलै, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शालिमार 16 जुलै, शालीमार 18 जुलै, हैदराबाद-अमृतसर 16, तर अमृतसर-हैदराबाद पार्सल गाडी 18 जुलैला रद्द करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज