fbpx

फेसबुकवर अश्लिल व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । जळगावात सहा जणांनी लहान मुलांच्या संदर्भातील अश्लिल व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केले. या सहा जणांवर गुरुवारी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुककडून तपासणी करुन मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दि. २६ मे ते २७ जून २०२० या एका महिन्यात फेसबुकवर आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो अपलोड करणाऱ्या युजर्सवर फेसबुकडून लक्ष ठेवले जात होते. फेसबुकचा एक स्वतंत्र विभाग या संदर्भात प्रत्येक युजरवर लक्ष ठेऊन होता. या विभागाने जगभरातील अकाऊंट तपासले. यात अनेक युजर्सने लहान मुलांच्या संदर्भातील आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड केल्याचे आढळुन आले. या अकाऊंटची माहिती फेसबुकने संबधित राज्यांच्या सायबर पोलिसांना दिली आहे. अशीच माहिती महाराष्ट्र सायबर विभागालाही मिळाली. त्या अनुशंगाने महाराष्ट्र सायबर विभागाने राज्यातील त्या-त्या जिल्ह्यातील संशयित अकाऊंटची माहिती संबधित सायबर पोलिस ठाण्यांना दिली त्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले.

 

यात जळगाव जिल्ह्यातील सौरभ संजय वाणी, अतुल व्यास, रॉकी पाटील, रेवती ठाकुर, सोनाली इंगळे, रक्षा या सहा अकाऊंटवरुन आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड झाल्याचे आढळुन आले आहे. सायबर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन या सहा जणांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत. संबधित अकाऊंटच्या युजर्सवर गुन्हा दाखल केला आहे. या अकाऊंटची माहिती काढणे सुरू आहे. संशयितांची नावे निष्पन्न झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती जळगाव जिल्हा सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बळीराम हिरे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज