शिरवेल महादेवचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला, दोन तरुण ठार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । शहरातील कांचन नगरात राहणारे काही तरुण श्रावण सोमवारनिमित्त मध्यप्रदेशातील शिरवेल महादेव येथे दर्शनासाठी गेले होते. मालवाहू गाडीने दर्शन घेऊन घरी परतत असताना घाटात अपघात होऊन दोन तरुण जागीच ठार झाले आहेत.

जळगावातील काही तरुण भाविक श्रावण सोमवार निमित्त मध्यप्रदेशातील शिरवेल महादेव येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास घाटात मालवाहू रिक्षा उलटल्याने जळगावातील कांचन नगरातील दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातात विकी परदेशी वय-२७ रा.वाणी मंगल कार्यालय जवळ, कांचन नगर व प्रशांत तांदुळकर वय-३१ रा.विलास चौक, कांचन नगर यांचा मृत्य झाला आहे. रावेर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दोघांवर शवविच्छेदन करण्यात आले. दोघांच्या मृत्यूने कांचननगर परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघातात अजय सुनिल वाल्हे (वय २१), गणेश रविंद्र सोनवणे (वय २३), परेश निंबा सोनवणे (वय २६), चेतन रविंद्र मोरे (वय २३), पवन रविंद्र मोरे (वय २२), महेश गोविंदा सोनवणे ( वय २१), गजानन रमेश पाटील (वय २४) व चालक विक्की अरूण चौधरी (वय २५) हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -