चाळीसगावातील अवैध धंदे बंद करा, अन्यथा… आ.मंगेश चव्हाणांचा इशारा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ ।  कन्नड घाटातील गुरुवारी मध्यरात्री अवैध वसुली प्रकरणात जे पोलिस अधिकारी व कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. कारवाई न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल तसेच चाळीसगाव शहरासह तालुक्यात ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतील, ते पोलिसांनी तात्काळ बंद करावे. अन्यथा यापुढेही स्टिंग ऑपरेशन सुरूच ठेवणार, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

तसेच वसुली करण्याऱ्या पोलिसांसह चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणीही आमदार चव्हाण यांनी केली. त्यांच्या स्टींग ऑपरेशनमुळे गुरुवारी मध्यरात्री अवैध वसुलीचा प्रकार उजेडात आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत आमदार मंगेश चव्हाण यांना संबंधित कर्मचाऱ्याने झिरो पोलिस असल्याचे सांगितले. त्यावरून झिरो पोलिसच वसुलीचे खरे हिरो असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पैसे घेणाऱ्या व्यक्तीचा पोलिस ठाण्याशी संबंध नाही

यासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हीडीओत आमदारांकडून पैसे घेणारा खासगी व्यक्ती होता. त्याचा पोलिस ठाण्यासोबत कोणताही संबंध नाही. झालेल्या प्रकाराची अद्याप चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील दोषींवर नक्की कायदेशीर कारवाई होईल, अशी माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -