fbpx

श्रावण सोमवार ठरला अपघात वार, जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, जखमीनेही सोडला जीव

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । हिंदू धर्मीयांमध्ये पवित्र मानल्या जाणार्‍या श्रावण मासाची सुरुवात ९ ऑगस्ट पासून झाली आहे. श्रावणातील पहिला सोमवार जळगाव जिल्हा वासियांसाठी अतिशय दुःखदायी ठरला आहे. सोमवारी जिल्हाभरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांनी आपला जीव गमावला आहे. तसेच रविवारी झालेल्या अपघातातील एका जखमीचाही मृत्यू झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध शिथील करताच नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यातील अपघातांची संख्या लक्षात घेतली असता दररोज कमीत कमी एक अपघात होत असून एकाचा तरी बळी जात आहे. दिव्याच्या अमावस्येच्या दिवशी पहूर-शेंदुर्णी दरम्यान झालेल्या अपघात दोघांना जीव गमवावा लागला होता तर यात एक जखमी होता. अपघात झालेल्या तरुणाचा सोमवारी मृत्यू झाला. सोमवारी पहाटे चाळीसगाव जवळ चारचाकी उलटल्याने मालेगावातील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. चाळीसगाव जवळील खडकी बु. पुलावर सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गतप्राण झाला आहे.

जिल्ह्यातील वाढत्या अपघातांना महामार्गाची दुरवस्था कारणीभूत असली तरी वाहनांचा भरधाव वेग आणि हेल्मेटचा वापर न केल्याने देखील अपघातात अनेकांचे जीव जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज