आंतरराष्ट्रीय पुरूष दिन : श्रद्धा कपूरने शेयर केली भावूक पोस्ट

बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलीवुडच्या सर्वात सुरेख अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे सोशल मीडियावर कोट्यवधी चाहते आहेत. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते आहे. आज इंटरनेशनल मेन्स डे (International Men’s Day) आहे. यानिमित्त श्रद्धाने दोन फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटोज ती ज्यांच्यावर खास प्रेम करते अशा व्यक्तींसोबतचे आहेत. या दोन व्यक्ती आहेत वडिल शक्ती कपूर आणि भाऊ सिद्धांत कपूर. या फोटोजमध्ये श्रद्धा खूप सुरेख दिसते आहे.

फोटोतून कळते आहे, की श्रद्धा खासगी आयुष्यात या दोघांच्या अतिशय जवळ आहे. एवढेच नाही, तर ती दोघांना स्पेशलही मानते. या फोटोजसोबत श्रद्धाने एक भावुक पोस्टही आपले वडिल आणि भावासाठी लिहिली. त्यात ती म्हणाली, ‘वास्तव आयुष्यात आदर्श व्यक्ती तीच आहे, जी सगळ्या प्रकारच्या अडचणींचा सामना करते, तरीही लोकांना क्षमा करणं तिला जमतं. ही व्यक्ती सगळ्यांसोबत अडचणीत उभी राहते. आणि मला अभिमान आहे, की माझ्या आयुष्यात ही दोन माणसं आहेत, ज्यांना मी खूप चांगलं ओळखते.

तिच्या कामाबाबत बोलायचे तर, श्रद्धा लवकरच रणबीर कपूरसोबच पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे नाव अजून निर्मात्यांनी जाहीर केले नाही मात्र चित्रपट 2023 मध्ये रिलीज होईल. यासोबतच 2022 मध्ये श्रद्धाचे दोन चित्रपट ‘नागिन’ आणि ‘चालबाज’ रिलीज होतील.

अनेक कलावंतांनी शेयर केली International Men’s Day च्या निमित्ताने आपली कहाणी

प्रसिद्ध अभिनेते आणि ‘द कपिल शर्मा शो’ची जज अर्चना पूरण सिंगनेही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मुले आर्यमान आणि आयुष्मान सेठी यांच्यासोबत तिचा घट्ट जिव्हाळा आहे. अर्चनाने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. यात ती म्हणते, ‘कोण म्हणतं, की मर्द को दर्द नहीं होता? माझा नवरा आणि दोन्ही मुले अतिशय हळव्या मनाची आहेत. त्यांना अश्रु ढाळायला संकोच वाटत नाही. यामुळे माझ्या नजरेत त्यांच्यासाठी आदर आणि प्रेम दोन्ही वाढतं.

लहान मुलगा आयुष्मान सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय आहे. तो बऱ्याचदा आपली आई किंवा गर्लफ्रेंडसोबतचे फोटोज शेअर करत असतो.
(फोटो क्रेडिट – आयुष्मान सेठी इन्स्टा)

‘मेड इन हेवन सीजन 2’ मध्ये झळकणार असलेले प्रवीण डबास, बॉलीवुडचे प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी, सौंदर्य शर्मा यांनीही केल्या सोशल मिडीया ‘कू’वर पोस्ट

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज