fbpx

30 रोजी मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या श्राध्द सोहळा

जळगाव लाईव्ह न्यूज । सुरेश पाटील । हजारो नागरिकांचे आणि दादा भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीचा श्राध्द सोहळा कार्यक्रम गुरुवार दि.30 सप्टेंबर2021 रोजी यावल तालुक्यातील मनवेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

धुनीवाले दादाजी दरबार मनवेल 30सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता आरती,8वाजता सेवा, दहा वाजता होम,हवन,सेवा व दुपारी 12 वाजे पासून महाप्रसाद, सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणूक,रात्री 8 वाजता महाआरती व रात्र भर ठिक ठिकाणाहुन आलेल्या दादा भक्त गण भजन गायनच्या कार्यक्रम होणार आहे.

mi advt

श्री.रेवानंद स्वामी यांनी मनवेल येथे काही दिवस वास्तव्य केले आहे.भाद्रपद महिन्यात अविधवा नवमीला त्यानी 1939 या वर्षी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील अंबाडा या गावी समाधी घेतली त्या दिवसापासून मनवेल गावी श्री स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजीच्या श्राध्द सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

वरणपोळी व गंगाफळची भाजी महाप्रसादच्या मेनु आहे.गंगाफळची भाजी प्रसिद्ध असुन कार्यक्रमात आलेले भावीक भाजी प्रसाद म्हणून घरी नेतात व आवडीने खातात.याठिकाणी दिवसभर भावीकांसाठी साकळी या गावात बापु धोबी या दादा भक्त गणासाठी मोफत शिरा वाटप करतात तर महर्षि वाल्मीक मित्र मंडळ मनवेल यांचा मार्फत पोहे वाटप तर चहा वाटप व रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात येत असुन साकळी – मनवेल दरम्यान मोफत प्रवासा करीता वाहन व्यवस्था करण्यात येत असते.या कार्यक्रमासाठी साकळी,शिरसाड,थोरगव्हाण, पथराडे,शिरागड,पिळोदा खुर्द, दगडी या गावातील भावीकांचे सहकार्य लाभते.

कोवीड १९ चे नियम पाडण्यांचे आवाहन या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भावीकांनी कोवीड 19 च्या नियमांचे पालन करावे मास्क लावून रांगेत सुरक्षित अंतर ठेऊन दर्शन घ्यावे असे आवाहन श्री. दादाजी भक्तगण मनवेल दगडी गावातील ग्रामस्थांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज