तामसवाडीत दुकानाची तोडफोड; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील तीन जणांनी दुकानदाराला मारहाण करत, दुकानाची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी येथील पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, २५ रोजी सायंकाळी फिर्यादी महेश पारधी व त्यांची बहीण तामसवाडी येथे आपल्या दुकानात पाववडे काढून विकत होते. गावातील बापू शांताराम महाजन, नवल माणिक बिरारी, दीपक रवींद्र हिवरे यांनी त्यांना मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच दुकानाची तोडफोड करत दुकानाचे सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान केले. संशयितांनी फिर्यादीच्या बहिणीसोबतही वाद घातला. याबाबत २९ रोजी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावातील शांततेला बाधा पोहोचली. काहीवेळ तणाव निर्माण झाला. मात्र, ग्रामस्थांनी धाव घेत मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटवण्यात आला होता.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -