fbpx

गाळेधारकांचे अनोख्यारितीने मनपाचा निषेध

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ । शहरातील १६ मार्केटच्यागाळेधारकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत असून दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज गाळेधारकांनी भजे तळून त्याची विक्री करून अनोखे आंदोलन केले.

ज्या गाळेधारकांच्या घामाच्या पैशावर जळगावमध्ये मनपाची व्यापारी संकुले उभी राहीली, मनपाला अब्जावधींची प्रॉपर्टी मिळाली , त्या गाळेधारकांनाच मनपा संपवायला निघाली आहे.

 एवढी पराकोटीची कृतघ्नतेचं दुसरं उदाहरण जगात नाही. महाराष्ट्रातील इतर मनपांनी जळगाव मनपासारखी गाळेधारकांना संपविण्याची सुपारी घेतलेली नाही. महानगराच्या पालन पोषणाचं आपलं कर्तव्य त्या मनपा प्रामाणिक बजावत आहेत. 

स्वतःच्या कुटुंबाची सुखे बाजूला ठेऊन व मनपावर विश्वास ठेवून ऐन तारुण्यात गाळेधारकांनी  मनपाला एवढी संकुले उभारायला आर्थिक मदत केली ; त्याच गाळेधारकांना वृद्धापकाळात मनपाने रस्त्यावर आज भजी -पकोडे विकायला लावले आहे.

या पापाची फेड करावी लागणार आहे. आमच्या मृत्यू शिवाय गाळे त्यांना मिळणार नाहीत हे त्यांनी पक्के ध्यानात ठेवावे. उपोषण स्थळी धर्मशाळा मार्केटचे सकाळी ९ ते १ रमेश तलरेजा, प्रकाश गागनानी, सुभाष तलरेजा, प्रशांत पगारीया, जगदीश दासवाणी उपस्थित होते तसेच दुपारी १ ते ५ सुरज हेमनानी, संदीप वालेचा, अनुप अडरेजा, रमेश माधवाणी, सुनील रोकडे उपस्थित होते.

भजी-पकोडे विकून आलेले पैसे जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त यांना मनीऑर्डरने गाळेधारक पाठवणार आहेत. यावेळी डॉ.शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, पंकज मोमाया, रिजवान जागीरदार, आशिष सपकाळे, सुरेश पाटील, विलास सांगोरे उपस्थित होते.

उद्या बेमुदत साखळी उपोषणस्थळी आंबेडकर मार्केट तर्फे किडनी विक्री आंदोलन करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज