fbpx

गावठी कट्टा खरेदी करायला गेलेल्यांवर गोळीबार ; एक जण जखमी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ । चोपडा तालुक्यातील उमर्टी येथे गावठी कट्टा खरेदी करण्यासाठी गेलेल्या पुण्यातील दोन तरूणांवर दुसऱ्या गटातील दोन ते तीन जणांनी गोळीबार करून त्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. यात एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, जखमीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत असे की, विकी अनिल घोलप व त्याचा मित्र प्रज्ञेश संजय नेटके (दोन्ही राहणार पिंपरी-चिंचवड) हे दुचाकीने (एमएम.१४-एफ.के.९६७५) गावठी कट्टा घेण्यासाठी उमर्टी येथे गेले होते. तेथून परत चोपड्याकडे येत असताना, इंडिका कारमधून चार ते पाच संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. पाठलाग करताना कारमधील संशयितांनी त्यांच्यावर गोळीबार केला. 

त्यांनी प्रज्ञेश नेटके याला पकडून कारमध्ये सोबत नेले. झटापटीत इंडिका कारची दुचाकीला धडक लागल्याने घोलप याच्या पायाला दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमी अवस्थेत विकी घोलप याला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात आणले.

गोळीबार करणार्‍यांना आपण ओळखत असल्याची माहिती अनिल घोलप याने दिली आहे. या प्रकरणात कट्टा खरेदी करणारे व त्यांच्यावर हल्ला करणारे हे गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज