fbpx

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार, १ गोळी सापडली

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२१ । भांडण सोडवल्याचा राग आल्याने जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर ७-८ जणांनी मिळून गोळीबार केला आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी कुलभूषण पाटील यांच्या घराबाहेर बंदुकीची एक बुलेट मिळून आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज सकाळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पिंप्राळा भागातील दोन गटातील वाद सोडवला होता. याचा राग आल्याने एका गटाकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर हे चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी पिंप्राळा येथील कुलभूषण पाटील यांच्या घरावर गोळीबार केला. यात ते सुदैवाने बचावले असून ते आता तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत.

जळगाव महापालिकेतील सत्तांतरात उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा मोठा वाटा होता. या पार्श्‍वभूमिवर आज थेट त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

उपमहापौर कुलभूषण त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता, आज दुपारी दोन जणांमध्ये झालेला वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याने महेंद्र राजपूत, मंगलसिंग राजपूत, बिऱ्हाडे यांच्यासह ७-८ जणांनी २ ठिकाणी हल्ला करीत सुमारे ५ गोळ्या झाडल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांनी शोध घेतला असता एक बुलेट मिळून आली असून आणखी रिकाम्या केस शोधणे सुरू आहे.

पहा लाईव्ह व्हिडीओ :

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज