धक्कादायक : पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची अंगठी हिसकावली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । भुसावळ मार्गे यावलला येणाऱ्या ६८ वर्षीय वृद्धाचा रस्ता अडवून पोलिस असल्याची बतावणी करत दोन भामट्यांनी हातातील सोन्याची अंगठी लांबवल्याची घटना गुरुवारी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

पाडळसे (ता.यावल) येथील दिलीप पुरुषोत्तम बऱ्हाटे (वय ६८) यांनी फिर्याद दिली. ते गुरुवारी सकाळी दुचाकीने (क्रमांक एमएच.०३-एपी.१६०८) गाडीने भुसावळ मार्गे यावल येथे येत होते. दरम्यान, शहराजवळील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या पुढे पावणे दहाच्या सुमारास त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर दोन जण आले. त्यांनी बऱ्हाटे यांना थांबवून आपण जळगाव येथील पोलिस आहोत. तुमच्याकडे गांजा असल्याचा संशय असल्याचे सांगत दुचाकी थांबवून बऱ्हाटे यांची अंगझडती घेतली. यावेळी बऱ्हाटे यांच्या हातातील ४० हजार रूपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. यानंतर दोघे भुसावळच्या दिशेने पसार झाले. बऱ्हाटे यांनी यावल पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी दोन अज्ञात भामट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -