fbpx

धक्कादायक : आईसमोरच विवाहित मुलीला पाजलं विष, पारोळ्यातील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । पैशाच्या वादातून २८ वर्षीय विवाहितेला मारहाण करत जबरदस्तीने विष पाजून तिचा खून केल्याची घटना बुधवार दि.१३ रोजी घडली. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पसार झाला आहे.

पारोळा येथील राजीव गांधी नगरातील रहिवासी उषाबाई प्रकाश खाडे या बुधवार दि.१३ रोजी त्यांची विवाहित मुलगी पूजा संदीप शिंदे हिच्यासोबत शेतात काम करत होत्या. त्याचवेळी पंकज हिलाल चौधरी (रा. झोडगे) हा तेथे दुचाकीने आला, यावेळी त्याने माझे पंधरा हजार रुपये द्यावे, अशी मागणी करत पूजाला मारहाण केली. पूजा हिने मी कोणतेही पैसे घेतले नाही पती किंवा सासरे यांनी पैसे घेतले असतील असे त्याला सांगितले. मात्र पंकज चौधरी याने काहीही ऐकून न घेता पूजाचा गळा दाबून जवळ पडलेले विषारी औषध तिला पाजले. यावेळी पूजाची आई उषाबाई खाडे यांनी विरोध केला, त्यांच्यात झटापटही झाली मात्र, पंकजने त्यांना ढकलून दिले. घटनेनंतर पंकज चौधरी याने घाबरून पूजाला दुचाकीवर बसवून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. दरम्यान, पूजाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज