धक्कादायक : खेडी येथे एकाची गळफास लावून आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । खेर्डी खु. ( ता. चाळीसगाव ) येथे एका ३८ वर्षीय व्यक्तीने  शेतातील लिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३ डिसेंबर रोजी दुपारी २ ते शनिवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर असे की, चाळीसगाव तालुक्यातील खेर्डी खु. येथील गोपीचंद भास्कर पाटील (वय-३८) यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरी बांधून त्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची थरारक घटना उघडकीला आली आहे. हि घटना ३ डिसेंबर रोजी दुपारी २ ते शनिवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेने परिसरात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सपोनि पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस नाईक प्रविण पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -