धक्कादायक : शतपावली करताना दुमजली इमारतीवरून कोसळून सेवानिवृत्त अभियंत्याचा मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । शहरातील बीएसएनएलच्या निवासी कॉलनीत राहणाऱ्या एका सेवानिवृत्त अभियंत्याचा दुमजली इमारतीच्या छतावर शतपावली करताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

बीएसएनएल अधिकारी कर्मचाऱ्यांची वसाहत जिल्हापेठ परिसरात उदय कॉलनीत आहे. बीएसएनएलचे सेवानिवृत्त अभियंता संजीव भास्कर पाटील (वय-६०) हे शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुमजली इमारतीच्या छतावर शतपावली करीत होते. फिरताना त्यांना फोन आल्याने ते मोबाईलवर बोलत असताना अचानक त्यांचा तोल घसरल्याने ते काठाजवळून खाली पडले. त्यावेळी त्यांचा मुलगा देखील सोबत होता. नातेवाईकांनी त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मयत संजीव पाटील यांच्या भावाने याबाबत माहिती दिली. ते बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ विवाहित मुली, जावई, २ नाती असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar